Labels

slider

Recent

Navigation

Premacha Sugandh



प्रेमाचा सुगंद पुन्हा एकदा मातीतून यावा
प्रेमाचा पाऊस आज माझावर हि पडावा
आज नवी व्हावी सारी धरती
अन  समुद्राला हि यावी प्रेमाची भरती
सुखाची स्वप्ने मी डोळ्यात लपवावी
डोळे उघडताच ती पूर्ण झालेली असावीत
प्रेमाच्या पावसात मी भिजले ओलेचिंब
प्रीतीचा  मिळाला आज नवा रंग
रंग  रांगात मी असे  रंगुनी गेले
मी माझीच  न राहता, न  माझात  उरले     
सारे काही नष्ट व्हावे उरावी फक्त हि प्रीत
प्रेमाचा सुगंद पुन्हा एकदा मातीतून यावा
प्रेमाचा पाऊस आज माझावर हि पडावा
 
                  ज्योती साळुंखे
Published with Blogger-droid v2.0.6
Share
Banner

Piyush Tayade

Post A Comment:

0 comments: