Labels

slider

Recent

Navigation

Premachi Pangal...प्रेमाची पानगळ...

Premachi Pangal...प्रेमाची पानगळ...
~~~प्रेमाची पानगळ...

जिच्या सोबतीची इच्छा होती
ती माझी झालीच नाही
तिच्या प्रेमात होरपळलो मी
तिने 'आग' पाहिलीच नाही

प्रेम , वचने चिंब भिजल्या
वाळुचे मनोरे....
पायान्नी सहज तुडविले
तिने खाली पाहिलेच नाही

पाषाण मनाने तिने फक्त
खेळ होता खेळला...
माझ्या मनाच्या ठिकऱ्या उडताना..
तिला कधी दिसलेच नाही

मनातली सुंदर चित्रे
कितीदा रंगवली ....पुसली
चुरगळल्या कागदांचा ढीग नुसता
पाहिजे तसे उतरलेच नाही

आपलेच नशीब... आपलेच दैव
कमनशीबी मी , सदैव
तिचे 'ऋतु' नेहमी फुलले
माझा 'वसंत' बहरलाच नाही !!

-मनिष भाटे



Share
Banner

Piyush Tayade

Post A Comment:

0 comments: