Labels

slider

Recent

Navigation

तिचं माझ भांडण

ती: तू माझ्याशी भांडत नको जाऊ बरं ..

तो: ते आपल्याला जमणार नाही... तेवढं सोडून बोल.. मी तर भांडणार...

ती: किती नालायक आहेस...
काय मिळतं तुला माझ्याशी भांडून...

तो: हो, नालायक तर आहेच...
अगं ते गाणं नाही ऐकलयेस का...
"कोई हसीना जब रूठ जाती है तो और भी हसीन हो जाती है"...

ती: हो ऐकलय...

तो: पण तसं काहीही नाहीये ....

ती: (वैतागून, त्याच्या खांद्यावर ४-५ चापटा मारत)... जा बाबा.. जा ...

तो: अरे हो हो...
बरं ठीक आहे..
आता ऐक...

मी तुझ्याशी भांडतो...
भांडतांना माझ्यावर जो हक्क दाखवतेस ना.. त्यासाठी...

मी तुझ्याशी भांडतो...
तुझे, "मी आहे म्हणून सहन करतीये" हे शब्द पेलण्यासाठी...

मी तुझ्याशी भांडतो...
"आजपासून बिलकुल बोलू नकोस माझ्याशी" हे वाक्य म्हणतांना तुझा बिथरलेला आवाज ऐकण्यासाठी...

मी तुझ्याशी भांडतो...
चेहऱ्यावर राग असतांना देखील एका अनामिक ओढीने माझ्याकडे बघणाऱ्या त्या डोळ्यांसाठी...

अन

मी तुझ्याशी भांडतो...
भांडण संपल्यावर, तू मारलेल्या घट्ट मिठीत घालवता येणाऱ्या त्या अविस्मरणीय 'क्षणांसाठी'

Share
Banner

Piyush Tayade

Post A Comment:

0 comments: