Labels

slider

Recent

Navigation

।| आज थोडं भांडणार आहे ।|

#MarathiKavitaBlog

।| आज थोडं भांडणार आहे ।|

शतकापासून मनात साचलेल दु:ख थोड मांडणार आहे..
टिळक महाराज तुमच्यासोबत आज थोडं भांडणार आहे ||धृ ||

माजघरातल्या मखरातून तुम्ही थेट मला रस्त्यावर नेलंत;
मंडप-सजावटीचा थाटमांडून एका वर्षात पॉप्युलर केलतं;
तेव्हा नव्हतं मनात माझ्या सुख असं सांडणार आहे ;
टिळक महाराज तुमच्या सोबत आज थोड भांडणार आहे (१)

जोरदार व्याख्याने, मेळे, स्पर्धा..
सगळे अजून आठवणीत आहे
सुपाएवढ्या कानात अजून हिराबाईचा षड्ज साठवणीत आहे
हिराबाई अन् मुन्नी मधला फरक
अाज मांडणार आहे ;
टिळक महाराज तुमच्या सोबत आज थोड भांडणार आहे (२)

दानपेटीत पडलेले नाणं आधी
खळकन वाजत होतं;
माझ्यासाठी दिलेले दान...
माझ्याच अंगी लागत होतं;
माहित नव्हतं भक्त मला
सोनसाखळयानी बांधणार आहेत;
टिळक महाराज तुमच्यासोबत आज
थोडं भांडणार आहे (३)

नवश्यांच्या इच्छा ऐकून आता कान किटले माझ,
अर्धोन्मिलीत डोळे केव्हाच मिटले माझे;
त्यांच्या सगळ्या इच्छा आता तुमच्याच कानात सांगणार आहे;
टिळक महाराज तुमच्यासोबत आज थोडं भांडणार आहे (४)

विसर्जनाची मिरवणूक आधी काही तासच चालत हाेती;
"लवकर या" असं सगळी मनापासून बोलत होती;
यंदा म्हणे मिरवणूकही दिवस-दिवस लांबणार आहे;
टिळक महाराज तुमच्यासोबत आज थोडं भांडणार आहे (५)

टिळक महाराज पुन्हा सारं पहिल्यासारखं होईल का?
पुढल्या वर्षी चिंता सोडून सुख फक्त राहील का ?
नाहीतर पुढल्या वर्षी कैलासावरच मी नांदणार आहे;
टिळक महराज तुमच्यासोबत आज थोडं भांडणार आहे (६)..

मित्रहो,
चला आपल्या धर्माचं पावित्र्य आपणच राखु या
बाप्पा सुद्धा म्हणेल "लवकर येतो"
असे वागून दाखवू या!
बाप्पा 'शुभस्ते पंथान: सन्तु...'

Share
Banner

Piyush Tayade

Post A Comment:

0 comments: