Labels

slider

Recent

Navigation

महाभारतातील एक गोष्ट

सुप्रभात
महाभारतातील ही गोष्ट आहे.
नक्की वाचा
पांडवांचा युद्धात विजय झाला. पूर्वी आपल्या हातून
झालेली पापे नाहीशी
करण्यासाठी व
मनःशुध्दीसाठी त्यांनी
तीर्थस्नानांची यात्रा करण्याचे
ठरविले. श्रीकृष्णाला सांगण्यासाठी व
त्याची संमती घेण्यासाठी सर्व
पांडव त्याच्याकडे गेले.
श्रीकृष्ण म्हणाला, "जात आहात तर जा. परंतु
मी तुम्हाला बरोबर न्यायला एक कडुनिंबाची
फांदी देतो.
तुम्ही जेथे जेथे जाल तेथे तेथे तिला पण स्नान घाला."
पांडव त्यानंतर भारतातील सर्व
तीर्थक्षेत्रांवर स्नान
करण्यासाठी तीर्थयात्रेला गेले.
तीर्थयात्रेहून परत
आल्यावर सर्व पांडवांनी
श्रीकृष्णाची भेट घेतली व
त्यांची फांदी त्याला परत करत ते म्हणाले,
"आठवणीने सर्व क्षेत्रांवर तिला स्नान घातले."
श्रीकृष्णाने सुरीने फांदीचे
तुकडे करुन सर्वांना खावयास
दिले व म्हणाला, "प्रसाद गोड आहे का ते जरूर सांगा."
सर्वांनी तुकडा तोंडात टाकल्यावर तोंड एकदम कसेसेच
केले. कारण प्रसादाची चव कडूच होती.
श्रीकृष्णाने
विचारले, "सर्व तीर्थक्षेत्रांमधे स्नान
करुनही कडूनिंबाची चव गोड
झाली का ?" "कशी होईल ?
स्नान घालून बाह्य बदल होईल.
आतला कडूपणा कसा जाईल?"
धर्मराजाने प्रश्न केला.
श्रीकृष्ण म्हणाला, "तेच समजावून
सांगण्यासाठी मी ही
डहाळी तुमच्याबरोबर दिली
होती.
तीर्थस्नानाने शरीर शुद्ध होईल. परंतु
मनशुध्दी किंवा आत्मशुध्दी
कशी होईल? त्यांचा संबंध
सदाचरणाशी, सदगुणांशी आहे...
बोध -मनशुध्दीसाठी ज्ञान, सदाचार, सेवा,
सत्त्वगुण
यांनी सुस्नात व्हावे तीर्थस्नानांने नव्हे.

#MarathiKavitaBlog

Share
Banner

Piyush Tayade

Post A Comment:

0 comments: