Labels

slider

Recent

Navigation

अक्षय तृतीया महत्व......

अक्षय तृतीया महत्व......
ह्या दिवशी हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे
वैशाख शुद्ध तृतीया
येते. *अक्षय्य तृतीया* हा महत्त्वाच्या साडेतीन मुहूर्तांपैकी
एक शुभमुहूर्त समजला जातो. आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. या दिवशी मातीचे घागरीयेवढे मडके आणून, त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो.पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात
 खीर
आंब्याचे पन्हे
किंवा चिंचोणी
, पापड
, कुरडया
इत्यादी वाढतात. सुगंधित पाण्याने भरलेला घटब्राह्मणाला दान केला जातो. असे केल्याने पितरांचा आत्मा शांत होतो असे मानले जाई.
या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ 'अक्षय्य'(न संपणारे) असे मिळते, असा समज आहे. अक्षय्य तृतीयेला ब्रह्मा
वश्रीविष्णु यांच्या मिश्र लहरी उच्च देवतांच्या लोकांतून, म्हणजे सगुणलोकांतून पृथ्वीवर येतात. त्यामुळे पृथ्वीवरील सात्त्विकता १० टक्क्यांनी वाढते, अशी कल्पना आहे.

अक्षय्य तृतीयेचे माहात्म्य
* जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो पापांतून मुक्त होतो.
* या दिवशी परशुरामाची पूजा करून त्यांना अर्घ्य दिले जाते.
* शुभ कार्ये या दिवशी होतात.
* श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते, की 'या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षय्य तृतीया असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (‍अविनाशी) होते.
या दिवशी बद्रिधामावर बद्रिनारायणाच्या मंदिरात प्रथम प्रवेश मिळतो.वृंदावनात कुंजबिहारी श्रीकृष्ण मंदिराचे दरवाजेपण उघडले जातात. ही विष्णूचा एक अवतार समजल्या जाणाऱ्या परशुरामाची जन्मतिथी आहे .......
आपना सर्वाना अक्षय तृतियाच्या मन:पूर्वक शुभेच्छा....


#MarathiKavitaBlog
Share
Banner

Piyush Tayade

Post A Comment:

0 comments: