||श्री||
|खंडोबा प्रसन्न|
स.न.वि.वि.
पत्रास कारण कि , मित्रांनो खूप वर्ष लोटली, कुणाचे मला पत्र आले नाही कि मी कुणाला पाठविले नाहीत. .
तुम्ही शेवटचे आंतरदेशी पत्र , पोस्टकार्ड कुणाला पाठवले? किंवा तुम्हाला कुणाचे आले? जर आठवून पाहा . .!
आज कपाट साफ करता करता एक पोस्टकार्ड फाईल मधून खाली पडले . .आणि गहीवरुन आले . .
एक काळ होता किती महत्त्व होते . .या पोस्टकार्ड, आंतरदेशी पत्र ,चिठ्ठी, तार यांना . .
यांच्या शिवाय माणसांची नाती एकमेकांत घट्ट राहणे मुश्किल होते . .
काकांचे, मामांचे ,आजोळचे पत्र आले की ते वाचताना सर्व मंडळी कशी त्या पत्रात डोळ्यासमोर साक्षात उभी राहत . .
त्या काळी आम्हा लहान मुलांचा पण खूप रुबाब होता . त्यावेळी मी चौथी ,पाचवीला असेन .
रस्त्यावर कुठे पोस्टमन कुणाचे घर शोधत असला तर . .लगबगीने ओ काका मला माहीत आहे त्यांचे घर . .चला मी दाखवतो . .मग त्यांना त्या घरी नेऊन शाबासकी मिळवायची . .
जर त्या घरात कुणाला वाचता येत नसेन तर आपला रुबाब अजून वाढला . .
ऐ पिंटू हे पत्र वाच जरा कुणाचे आले आहे ?
मग त्यांना ते वाचून दाखवून खावू पण मिळवायचा . .किती रे हुशार तु . . आम्ही मेले अडाणी . .
किधी कुणाची चिठ्ठी, पत्र लिहून दे . . .
घरात वरती कौलालाच्या लाकडाला . . ऐका तारेमध्ये कित्येक वर्षाची जुनी पत्रे जपून घुसवून अडकवलेली असायची . . .किधी गरज पडली तर उपयोग होयचा . .शाहनिशा करायला . . कधी कधी आजोबा आजीच्या मनात आले , तर पिंटू ते जरा टपाल काढून वाचून दाखव रे . .!
तार आली म्हणजे तर पोटात धडकिच यायची . .आता कोण गेले ? असा पहिला विचार मनात येयाचा . .कधी कधी तर वाचण्या अगोदर घरात रडारडी सुरु होयाची . .
आपल्या गावचा कोणी गाववाला जर गावावरुन आला तर त्याच्या कडे हमकास चिठ्ठी देलेली असणारच . .
आता मात्र ते काही राहीले नाही . . तो कागूद, पोस्टकार्ड ,तार, आंतरदेशी पत्र ,चिठ्ठी , सांगावा , निरोप , पतार . . . सर्व भुतकाळ झाला आहे . .
तरी आता मी माझे पत्र संपवत आहे . . तुम्ही सर्व आंनदात राहो हीच प्रार्थना करतो . .
येथील आजी, आजोबा यांना शाष्टांग दंडवंत . . काका, काकी , मामा,मामी , मित्र यांना सप्रेम नमस्कार , आणि लहानांना शुभ आशिर्वाद आणि गोड गोड पापा . . आपलीही खुशाली जरुर कळवावी आतुरतेने वाट पाहत आहे . .
कळावे
लोभ असावा . .
आपला
Post A Comment:
0 comments:
Post a Comment