Labels

slider

Recent

Navigation

Aakhercha Jai Maharashtra ...

स्वर्गा मध्ये छत्रपती शिवराय झोपलेले असतात..

अचानक त्यांच्या पायाला स्पर्श होतो..

महाराज विचारतात कोण आहे ?

आणि आवाज येतो
महाराज मी आहे बाळ..

महाराज उठतात आणि म्हणतात आलास का बाळ,
कशी झाली मोहिम ?

बाळासाहेब म्हणतात महाराज आपण दिलेली मोहिम फत्ते झाली असुन..

मराठी जनता आता एकवटलेली आहे..

महाराज आपल्या आशीर्वादातून सर्व शक्य झाले..

महाराज म्हणतात बाळ तु ३५० वर्षा नंतर पुन्हा एकदा मराठी जनतेच्या मनात स्वाभिमान जागवला..

तु स्वराज्याचा मावळा असल्याचा मला अभिमान आहे..

बोल बाळ तुला काय हवं ?

बाळासाहेब म्हणतात महाराज मला फक्त शिवशाही हवी..
स्वराज्य हव..

महाराज म्हणतात बाळ नक्कीचं..

तुझी इच्छा पूर्ण होईल..

पुन्हा एकदा स्वराज्य निर्माण होईल..

कारण त्यासाठी आपण आपल्या महाराष्ट्रात पुन्हा जन्म घेणार आहोत..

बाळासाहेब महाराजांच्या पायाला स्पर्श करतात..

व म्हणतात महाराज आपल्या सोबत पुन्हा महाराष्ट्रात जन्म घेणं मी माझ व महाराष्ट्राचं भाग्य समजतो..

जय महाराष्ट्र !!
 

Share
Banner

Piyush Tayade

Post A Comment:

0 comments: