Labels

slider

Recent

Navigation

लोकशाही…२०१४

लोकशाही…२०१४
ना ’शरदा’चे चांदणे
ना ’सोनिया’चा दिस
’घड्याळा’चे ओझे ’हाता’ला
म्हणून ’आय्‌’ कासावीस!
’कमळा’च्या पाकळ्यांची
’यादवी’ छ्ळते मनाला
’धनुष्य’ आलयं मोडकळीस
पण जाणीव नाही ’बाणा’ला!
’विळा, हातोडा’ आणि ’कंदीला’ला
आजच्या युगात स्थान नाही
डब्यांना ओढू शकेल एवढी
’इंजिना’त जान नाही!
’मन’ आहे ’मुलायम’
पण ’माया’ कुठेच दिसत नाही
’हत्ती’वरून फिरणारा
’सायकल’वर बसत नाही!
कितीही उघडी ठेवा ’कवाडे’
’प्रकाश’ आत जाणार नाही
विसरलेले ’आठवले’ तरीही
’गवई’ गीत गाणार नाही!
’बंडखोर पक्षां’चा थवा
’पार्टी’साठी आतूर
कुंपणच खातय शेताला
आणि बुजगावणंही फितूर!

Share
Banner

Piyush Tayade

Post A Comment:

0 comments: