Labels

slider

Recent

Navigation

बाप्पांची इच्छा...

#MarathiKavitaBlog

बाप्पांची इच्छा...
कपडे तुम्ही शिवाल तर अंग तुमचं झाकेल,
अन्न तुम्ही शिजवाल तर पोट तुमचं भरेल...
मी आहे चोहीकडे, मला एकाच ठिकाणी शोधू नका,
माझ्या नावाने अंधश्रद्धेचा स्त्रोत तुमही बनू नका
तूमच्या मनात माझा वास आहे, मुर्त्यांमध्ये मला पाहू नका,
आराधना माझी करण्यापेक्षा, स्वतःच्या आंतरातम्यात मला वाकून बघा..
रूप माझं एकच आहे, मी कुणाचा राजा नाही,
तुमचं दुःख जाणतो, एकटं तुम्हाला सोडणार नाही...
१०८ नावं आहेत माझी, अजून नावं देऊ नका,
गल्लो गल्ली प्रदर्शन उभारून अपमान माझा करू नका...
लाखो कोटींचे दान येते माझ्यापुढे, मी काय करू त्याचे,
माझी कृपादृष्टी आहेच तुमच्याववर, हे पैसे आहेत तुमच्या कष्टाचे....
घरा घरात माझी पूजा करता,
मग रांग लावून मंदीराकडे का धाव घेता..
खेळ मांडू नका माझ्यावरच्या श्रद्धेचा..
पावेन मी त्यालाच जो मार्ग निवडेल सत्याचा....

Share
Banner

Piyush Tayade

Post A Comment:

0 comments: