Labels

slider

Recent

Navigation

तुलना...

काय गंमत पण आहे बोलण्यात आपण
"शब्द" किती पटकन बदलतो,
कशालाही नावं देताना आपण त्यांच्या
"स्थाना"वरून निश्चित ठरवतो.


नितळ रस्त्यावरच्या खराब भागाला
"खड्डा" म्हणून हिणवतो,
तर नितळ गालावरच्या छोट्या खड्ड्याला
"खळी" म्हणून खुलवतो.

भिंतीवर पडलेल्या काळ्या ठिपक्याला
"डाग" म्हणून डावलतो,
तर चेहऱ्यावर आलेल्या काळ्या डागाला
"तीळ" म्हणून गोंजारतो.

तुटुन पडलेल्या केसांच्या पुंजीला
"जटा" म्हणून हेटाळतो,
तर चेहऱ्यावर येणाऱ्या केसांच्या जोडीला
"बटा" म्हणून सरकवतो.

असच असतं आयुष्यात आपलेही
"सोबती"नेच आपण तसे घडतो,
चुकीच्या सोबतीने माणूस बहकतो
"योग्य" सोबतीनेच अधिक बहरतो.

Share
Banner

Piyush Tayade

Post A Comment:

0 comments: