Labels

slider

Recent

Navigation

आजीबाईचा बटवा

खोकून खोकून कोरडा झाला जर का घसा
मधातून चाटा हळद, ज्येष्ठमध आणि अडुळसा ||1||
लागला मुका मार,सुजून पाय झाला ना गारद
लेपासाठी तुरटी ,रक्त चंदन उगला आंबेहळद ||2||
कोंड्याचा झाला आहे का डोक्यामधे साठा
केस धुताना लावा मेंदी, शिकेकाई, रिठा ||3||
सकाळी सकाळी उठा देवाला करा तुम्ही वंदन
उन्हाळ्यात थंडाव्यासाठी कपाळी लावा चंदन ||4||
उन्हामधे रापून चेहरा झाला का सावळा गडद
कांती उजळण्यासाठी दुधातून प्या थोडी हळद ||5||
बारीक आहे कुडी म्हणून होऊ नको तू बावरी
दूध आणि साखरेबरोबर खा थोडी शतावरी ||6||
पिकला एक केस होईल डोक्यावर चांदी
नैसर्गिक रंग आहे, केसांना लावा मेंदी ||7||
केसाना लावा कचूर सुगंधी,मेंदी जास्वंद
केस होतील लांब सडक सुगंध दरवळेल मंद ||8||
गाणं म्हणण्यासाठी झाला आहात तुम्ही अधीर
गोड मधुर आवाजासाठी खा ज्येष्ठमध, शंगीर ||9||
अशक्तपणामुळे तुमचा दुखतो आहे का सांधा ?
शक्तीसाठी गायीच्या दुधातून प्या अश्वगंधा ||10||
पित्तप्रकोप झाला आहे ,पोटातून येत आहेत कळा
पोटात घ्या आवळा,हिरडा,बेहडा म्हणजेच त्रिफळा ||11||
वातामुळे पोटामध्ये होत आहेत का वेदना ?
खा ओवा,सैंधव मीठ, आलं,लिंबू पुदिना ||12||
संगणकावर काम करून थकली आहे का नजर
डोळ्यांसाठी चांगले खावे पपई आणि गाजर ||13||
लहान वयामधेच ढोल मटोल झाला तुमचा बेटा
जाडी कमी करण्यासाठी जरा कमी खा बटाटा ||14||
धूर धूळ प्रदूषणाचा झाला आहे आता कळस
शुद्ध हवेसाठी झाडे लावा कडूनिंब आणि तुळस ||15||
छोटे छोटे आजार बरे करा घरच्या घरीच हटवा
प्रत्येकाच्या घरी आहे ना आजीबाईचा बटवा ||16||
Share
Banner

Piyush Tayade

Post A Comment:

1 comments:

SURESH PITRE said...

आपल्या सोशल खात्यावर / ब्लॉगवर / संकेतस्थळावर आपण माझी पूर्वीच प्रकाशित झालेली कविता पुन्हा प्रकाशित केली आहे त्या संबंधी - - '' आजीबाईचा बटवा '' हि मी लिहिलेली कविता दिवाळी अंकात फार पूर्वी प्रकाशित झाली होती , त्या नंतर २०१२ ला मी माझ्या ब्लॉगवर अपलोड केली आणि काल सहज माझ्या वृत्त पत्रातून काही कविता दिसायच्या त्या आहेत का पाहायला गेलो तर जवळ ७-८ ठिकाणी वेगवेगळ्या ब्लॉगवर / संकेतस्थळावर वगैरे काही ठिकाणी माझे नांव काढून आणि काही ठिकाणी काहींनी स्वतःच्या नावाने पुन्हा प्रकाशित केली आहे , म्हणजे माझे साहित्त्य चोरून हा उद्योग केलेला आहे , तेव्हा त्या सर्वाना मी हे सांगतो आहे कि तुमच्या ब्लॉगवरून / संकेत स्थळावरून माझे साहित्त्य हटवा नाहीतर त्याखाली मूळ कवीचे नांव लिहा अन्यथा योग्य ती कारवाई करावी लागेल , कारण माझ्याकडे ह्याची हार्ड कॉपी प्रूफ आहे ज्या अंकात हि कविता पूर्वीच प्रकाशित झालेली आहे जी मी तुम्हाला पुरावा म्हणून दाखवू शकतो. साहित्त्य चोरांना इतकेही कळत नाही कि गुगलवर तुम्ही त्या कवितेतील एक ओळ लिहून शोधू शकता कि ज्याद्वारे कोणी कोणी ते साहित्त्य कुठे कुठे मूळ कवीचे नांव हटवून अपलोड केले आहे ते कळू शकते. आणि कमेंट करणाऱ्या वाचकांनी पण असा शोध घ्यावा कि त्याचे मूळ कवी कोण आहेत ? - कवी - सुरेश रघुनाथ पित्रे ,चेंदणी, ठाणे. - २०-०७-२०२१